बुधवार, १५ ऑगस्ट, २०१८

तुरा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेस दीले 'संगणक' भेट

विलास आडसकर यांचा वतिने
संगणक भेट
*धनंजय आडसकर यांच्या हस्ते वितरण*
पाथरी /प्रतिनिधि :-
तालुक्यातील तुरा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त जि प प्राथमिक शाळेत विलास आडसकर यांनी संगणक भेट दिले धनंजय आडसकर पाटील यांच्या वतिने 15 ऑगस्ट रोजी याचे वितरण करण्यात आले.
तुरा येथील जि.प. प्रा शाळा ई -लर्णींग व सर्व सोयीयुक्त आहे परंतू काही दिवसांपुर्वी शाळेतील संगणक नादुरूस्त झाले होते हि हि कमतरता लक्षात घेता तुरा येथील विलासराव आडसकर यांच्या वतिने शाळेस प्रजासत्ताक दिनानिमित्त संगणक भेट देण्यात आले त्यांचे बंधू धनंजय आडसकर पाटील यांच्या हस्ते 15 ऑगस्ट रोजी याचे वितरण करण्यात आले.
यावेळी धनंजय आडसकर पाटील बोलताना म्हणाले की, माणसाने सर्वाधिक पैसा व वेळ खर्च करायचा असल्यास तो शिक्षण व माहिती क्षेत्रात करावा कारण या दोनच गोस्ष्टी व्यक्तीला प्रगतीकडे घेवून जातात.

यावेळी सरपंच सौ. संगिता तोडके, तं. मु. अध्यक्ष गणेशराव आडसकर, पो पा विष्णु मोरे ,शा व्य समिचे अध्यक्ष नंदु चाळक, ग्रा पं सदस्य सतिषराव आडसकर ,ग्रा पं सदस्य दत्ताराव आडसकर, भरत आडसकर, बाजीराव चाळक, तसेच गावातील सर्व नागरीकांची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...