रविवार, २६ ऑगस्ट, २०१८

संविधानानुसार सर्वांना माणुस म्हणुनि जगण्याचा अधिकार प्राप्त असल्याने संविधानाचे रक्षण करणे आवश्यक -कन्हैया कुमार

जिंतूर  :- “संविधान बचाव देश बचाव” या अभियानास जिंतूर येथे प्रचंड मोठ्या स्वरुपात नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. विजयराव भांबळेतर प्रमुख वक्ते म्हणून जे.एन.यु. चे माजी सांसद श्री. कन्हैया कुमार हे होते तर प्रमुख पाहुणे जि.प. अध्यक्षा उज्वलाताई राठोड, सभापती अशोकराव काकडे, राजन क्षीरसागर, प्रा.डॉ.आव्हाड, आदी मंचावर उपस्थित होते.

कार्यक्रमाची प्रस्तावना आ.विजय भांबळे यांनी करत कन्हैया कुमार सारखा एक विद्यार्थी केवळ प्रचलित व्यवस्थे विरुध्द बोलून संविधानानुसार सर्वाना समान वागणूक मिळावी, हाताला काम मिळावे, जाती-जातीमध्ये बंधुभाव राहावा म्हणून प्रयत्न करत असून सध्याच्या देशातील वातावरणानुसार सरकारचे अपयश लपविण्यासाठी व सत्य बोलणाऱ्यास देशद्रोही तर संविधानाची प्रत जळणाऱ्याचे विरुद्ध कोणतीच कारवाई हे सरकार मुद्दामहोऊन करत नाही असे सांगत सर्वांनी एकत्रित राहावे असे आवाहन केले.

अनेक महापुरुषांनी एकत्रित येऊन इंग्रजांचे विरुद्ध महत्वपूर्ण लढा देऊन, बलिदान देऊन देशाला स्वतंत्र मिळवून दिले. या देशातील राज्यघटनेने सर्वाना समान अधिकार दिलेला असताना जाती-जातीत विषमता निर्माण करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम सरकार करत असल्याचे सांगितले.छत्रपती शिवाजी महाराज, गौतम बुद्ध, डॉ.बाबासाहेबांचा ब अनेक महापुरुषांचा भगवा रंग वेगळा होता हे सांगत गांधीजी सारख्यावर गोळ्या झाडून मनुवादी लोकांनी गोडसेचे गुण गायला सुरवात केली . त्याचबरोबर सर्वाना समान अधिकार मिळाले पाहिजे, सर्व समाजाचे मागणीनुसार आरक्षण देण्यात यावे, प्रत्येकाला सन्मानाने जगता आले पाहिजे अशी व्यवस्था निर्माण करणे आपले काम आहे असे सांगत “हटा संविधान तो गया हिंदुस्थान” हा नवा नारा देत अनेक दाखले देऊन सरकारवर मोदीवर सडकून टीका केली आणि सर्वाना सहभागी करत आझादीचे गीताने आपल्या भाषणाची सांगता केली. कार्यक्रमासाठी सर्व समाजाचे संघटना, धार्मिक संघटना उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार  अँड.विनोद राठोड यांनी केले तर कार्यक्रम जलील मौलाना,मुक्तीबेग मौलाना,ताजजमुल मौलाना,शिराज मौलाना,नानासाहेब राऊत ,प्रसादराव बुधवत, विसवनाथ राठोड,हेमंत राव अडलकर,कपिल भाई फारुकी,अजय चौधरी,अशोक काकडे विनायकराव पावडे, विठलं राव  घोगरे मुरलीधर जी मते ,रामरावजी उबाळे ,मधूकरजी भवाले,विजय खिस्ते,सर्व सन्माननीय न प सदस्य,प सल सदस्य,सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते ,हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोज थिटे, पप्पू मते,    अभिनय राउत, मनोहर डोईफोडे, शरद मस्के, उस्मान पठाण, दलमीर खान, शौकत लाला, संदीप राठोड, संजय काळे, बालाजी नव्हाट, रवी होडबे आदींनी प्रयत्न केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...