बुधवार, ८ ऑगस्ट, २०१८

पाथरी बंद-सकल मराठा समाबांधवच्यावतिने रास्ता रोको तर काही ठीकाणी ठीय्या आंदोलन शांततेत सुरु.

       लक्ष्मन उजगरे -आवाज परभणीकरांचा सकल मराठा समाजाच्या वतीने पाथरीत कडकडी बंद
          सकल मराठा समाजाच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.त्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग आष्टी फाटा याठीकाणी शेतकर्यांनी आपल्या बैलगाड्या सहीत या आदोलनात आपली उपस्थिती लावेली आहे. त्याच बरोबर पोखर्णी फाटा येथे महीला व मुलीसह मराठा आदोलक यानी ठीय्या आंदोलन व रास्ता रोको सुरु केला आहे.तर पाथरी सोनपेठ रस्त्यावरील आय.टी.आय काँलेज परीसरातील सोनपेठ,तुरा मार्गावरोध मराठा  आंदोलकांनी आंदोलन सुरु केले आहे.त्याच बराेबर पाथरी सेलु रोडवरील कारखाना परीसरात देखील आंदोलकांनी ठीय्या आंदोलन शांततेत सुरु केले आहे. 
              तसेच या बंदमध्ये बससेवा,पेट्रोल पंपासह शाळा ,महविदयालय तसेच शहरातील बाजार पेठ ही कडकडीत बंद पाळणयात आला आहे तसेच पोलीस कडुन चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहरांमध्ये आज पाथरी मराठा आरक्षण साठी सुरु आंदोलन शांततेत व लोकशाही  मार्गाने अत्तापर्यंत सुरु आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...