पाथरी तालुक्यातिल जवळां झुटी येथिल १९ वर्षिय तरुनाचा खुन करण्यात आला होता.चार जनांनी मोटारीचा व्यहार वअनैतिक संबधाच्या संशयातुन धारदार शस्रांनी त्याचा खुन केला. त्याचा म्रतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जायकवाडीच्याल कालव्यात म्रतदेह फेकुन दीला होता.या प्रकरणी तात्काळ सुत्रे हालवुन अवघ्या २४तासात एलसीबीच्या पथकाने ४जनाना जेरबंद केले.त्यांना पुढील कार्यवाही साठी पाथरी पोलिसांच्या स्वाधिन केलेआहे.१८ ऑगस्ट रोजी दिगंबर लिंबाजी नाईकनवरे (१९, रा. जवळा झुटा) यास काही लोकांनी बोलावून त्याचे अपहरण केले. त्यानंतर धारधार शस्त्रांनी त्याच्या मानेवर, हनुवटी आणि गळ्यावर वार
करत त्याचा खून केला, अशी फिर्याद मृताचा भाऊ दत्ता लिंबाजी नाईकनवरे यांनी पाथरी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने संशयित व्यक्तींची माहिती गोळा केली.
त्यानुसार अंगद झुटे, शेख खदीर इस्माईल, लक्ष्मण झुटे व गणेश सुरवसे (सर्व रा. जवळा झुटा) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अंगद झुटे याला माजलगाव येथून तर अन्य तिघांना त्यांच्या राहत्या घरातून उचलण्यात आले. चौकशीत त्यांनी महिंद्रा स्कारपियो गाडीचा व्यवहार आणि अनैतिक संबंध असल्याच्या रागातून खून केल्याचे कबूल केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा