सोमवार, २० ऑगस्ट, २०१८

भर पावसात भारिपचा मीनवत येथे आक्रोष मोर्चा

*भर पावसात भारिपचा मानवत येथे आक्रोष मोर्चा

भारिप बहुजन महासंघ, मानवत जिल्हा परभणी च्या वतीने दि. 20 आँगष्ट रोजी *भाजप सरकार विरोधी आक्रोष मोर्चा* भर पावसात काढण्यात आला.  नगर परिषद मानवत ते तहसिल कार्यालय मानवत पर्यत हजारो महिला व पुरुष भर पावसात मोर्चात सहभागी होते. मोर्चाचे नेत्रत्व जिल्हाध्यक्ष प्रा.डाँ. प्रविण कनकुटे यानी केले तर मोर्चाचे आयोजन तालुकाअध्यक्ष नंदु कुमावत, य़ुवक तालुकाअध्यक्ष मिलींद मोरे व शहराध्यक्ष गाैतम जमदाडे यानी केले होते.
याप्रसंगी भाजप सरकार विरोधी घोषणा देऊन मानवत परिसर दणाणुन सोडला होता.
मोर्चाला जिल्हा सचिव वंदना ताई जोंधळे, जिल्हा सचिव लिंबाजी ऊजगरे, जिल्हा सचिव श्रिरंग पंडीत, जिल्हा उपाध्यक्ष महेन्द्र ठेंगे, के.वाय.दवंडे, गनी भाई, अँड. अशोक पोटभरे, प्रदिप लहाडे, आनंद कांबळे, सिध्दांत भाग्यवंत, राजेश गोटे, भीमराव गोटे, किशोर एडके, संपत पंडीत, रामभाऊ गालफाडे, उत्तमराव पंडीत, भास्कर भालेराव, संजय जोंधळे,  यांच्यासह अन्क मान्यवर उपस्थीत होते. मोर्चाला मानवत, पाथरी, सेलु तालुक्यातुन हजारो लोक सहभागी होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...