रविवार, २६ ऑगस्ट, २०१८

कन्हैया कुमारच्या जिंतुर येथिल जाहीर सभेला आ.बाबाजाणीदुर्राणी,सुरेश वरपुडकरसहीत राँ.का.चे बरेच नेते गैरहजर

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिंतूर येथील आमदार विजय भांबळे यांनी आयोजित केलेल्या कन्हैया कुमार च्या जाहीर सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तसेच जिल्ह्यातील बडे नेते अनुपस्थितीत असल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे...जिंतूरतील सभेसाठी हे नेते का पोहचू शकले नाहीत यावर चर्चा सुरु आहे .. विशेष म्हणजे पक्षाचे भांबळे वगळता एकही आमदार येथे उपस्थित झाले नाहीत ..

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर यांच्यासह जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेते कन्हैया कुमार च्या उपस्थितीत झालेल्या जिंतूर येथील सभेसाठी गैरहजर होते....
. परभणी आणि पाथरी या दोन ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले अनेक नेते गैरहजर असल्यामुळे याच सभेची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली होती जिल्हाध्यक्षांनी आमदार विजय भांबळे यांची सभा का टाळली असा प्रश्न उपस्थित झाला आहे उत्तर मात्र अजून मिळाली नाही...... विशेष म्हणजे अंधार भावे यांनी ही सभा आयोजित केली होती तरीदेखील जिल्हाध्यक्ष गैरहजर राहिले या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही....

संविधान बचाव देश बचाव” या अभियानास जिंतूर येथे प नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. विजयराव भांबळे तर प्रमुख वक्ते म्हणून जे.एन.यु. चे माजी सांसद . कन्हैया कुमार हे होते तर प्रमुख पाहुणे जि.प. अध्यक्षा उज्वलाताई राठोड, सभापती अशोकराव काकडे, राजन क्षीरसागर, प्रा.डॉ.आव्हाड, आदी मंचावर उपस्थित होते.

कार्यक्रमाची प्रस्तावना आ.विजय भांबळे यांनी करत कन्हैया कुमार सारखा एक विद्यार्थी केवळ प्रचलित व्यवस्थे विरुध्द बोलून संविधानानुसार सर्वाना समान वागणूक मिळावी, हाताला काम मिळावे, जाती-जातीमध्ये बंधुभाव राहावा म्हणून प्रयत्न करत असल्याचे सांगितले....
कन्हया कुमारने
अनेक दाखले देऊन सरकारवर मोदीवर सडकून टीका केली आणि सर्वाना सहभागी करत आझादीचे गीताने आपल्या भाषणाची सांगता केली.
कार्यक्रमासाठी सर्व समाजाचे संघटना, धार्मिक संघटना उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार  अँड.विनोद राठोड यांनी केले तर कार्यक्रम जलील मौलाना,मुक्तीबेग मौलाना,ताजजमुल मौलाना,शिराज मौलाना,नानासाहेब राऊत ,प्रसादराव बुधवत, विसवनाथ राठोड,हेमंत राव अडलकर,कपिल फारुकी,अजय चौधरी,अशोक काकडे विनायकराव पावडे, विठलं राव घोगरे मुरलीधर मते ,रामराव उबाळे ,मधूकर भवाले,विजय खिस्ते,सर्व न प सदस्य,प सल सदस्य,सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते ,हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोज थिटे, पप्पू मते, अभिनय राउत, मनोहर डोईफोडे, शरद मस्के, उस्मान पठाण, दलमीर खान, शौकत लाला, संदीप राठोड, संजय काळे, बालाजी नव्हाट, रवी होडबे आदींनी प्रयत्न केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...