स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शांताबाई नखाते विद्यालयात खेळाडूंचा सत्कार...
पाथरी-
वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ परभणी संचलित शांताबाई नखाते विद्यालय पाथरी येथे आज दिनांक १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तालुकास्तरीय विविध क्रीडा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.अनिल भाऊ नखाते साहेब (सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पाथरी) तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.राजेशजी ढगे(सभापती पंचायत समिती पाथरी),मा.रमेशजी तांगडे(उपसभापती पंचायत समिती पाथरी), मा.राधाकिशन डुकरे(पंचायत समिती सदस्य),मा.जी.टी.मानोलीकर(कमांडो प्रशिक्षक),मा.कैलासराव शिंदे(उपसरपंच वडी),मु.अ.एन.ई.यादव,प्राचार्य के.एन डहाळे,क्रीडाशिक्षक तुकाराम शेळके,कांबळे आर.व्ही,अरविंद गजमल आदी उपस्थित होते.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी & गटसाधन केंद्र पाथरी यांच्या सयूंक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या तालुका स्तरीय क्रिकेट,कबडॖडी ,व्हाॅलीबाल,मैदानी, कुस्ती, बुध्दिबळ,कराटे, तायक्वांडो या क्रीडा प्रकारात शांताबाई नखाते विद्यालय पाथरीच्या खेळांडूनी पुढील प्रमाणे यश संपादन करत जिल्हा स्पर्धेसाठी पाञता सिध्द केली. १४ वर्ष गटात क्रिकेट संघ प्रथम त्यात प्रथमेश सोंळके,कृष्णा नखाते,वैभव यादव,कार्तीक शिंदे यांनी चांगली कामगिरी केली.१९ वर्ष मुले/ मुली प्रथम, कुस्ती स्पर्धेत (५) खेळाडू प्रथम सिमा घोडे,श्रेया चव्हाण,मयुरी राऊत,पवन जाधव, व्हाॅलीबाॅल मध्ये १४ वर्ष मुले/१७ वर्ष मुली/ १९ वर्ष मुले/मुली प्रथम,त्यात श्रध्दा नवघरे,शामबाला गाणे,ईश्वरी देशमुख,आरती जाधव,कांचन कुटे,स्वप्नाली वाकडे, मयुरी शिंदे,यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.कराटे मध्ये(३) खेळाडू शुभम चिंडाले ,कोल्हे,कु.मोहीनी पोले,कु.श्रृष्टि पामे प्रथम,योगा मध्ये सुयेश बोत,शुभम चिंडाले.बुद्धीबळ मध्ये (११) खेळाडू प्रथम १४ वर्ष मुली श्रध्दा आमले,स्वप्नाली वाकडे,१७ वर्ष मुले आदित्य गिरी,वैभव शिंदे, संजय जोशी १९ वर्ष मुले/ मुली निखिल थावरे,किरन वाकडे,कु.सारिका आमले,निकिता थावरे,नंदिनी बोत,रेश्मा खटले,मैदानी खेळात (२१) खेळाडू १९ वर्ष रिले शेख अर्शद,रामाजी कसबे,संघरत्न धनले,शुभम चिंडाले, १७ वर्ष रिले गणेश पोपळघट,अनिकेत चव्हाण,प्रशिक नवगीरे,विजय राठोड .१४ वर्ष रिले कृष्णा नखाते,वैभव यादव,कार्तिक शिंदे, प्रथमेश शिंदे,रूपाली नवघरे-१०० मी.धावणे,३ किं.मी.धावणे प्रथम,आरती टाक- १०० मी.धावणे,गोळा फेक,लांब उडी प्रथम,जिया घुंबरे- लांब उडी - प्रथम, भाग्यश्री हारकळ- उंच उडी प्रथम,प्रथमेश सोंळके-१००व२०० मी.धावणे,लांब उडी प्रथम,अजिंक्य शिंदे १०० मी व २००मी प्रथम,कबड्डी स्पर्धेत १४ वर्ष मुले,मूली,१९ वर्ष मुले/ मुली प्रथम या सर्व यशवंत खेळाडूंचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला व पुढील स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेळके टी.एस यांनी तर आभार कांबळे आर.व्ही यांनी मानले.याप्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थी,पालक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा